गोल पोस्ट गुन्हा मुळशी पॅटर्नसारखा पाठलाग करत तरुणावर कोयत्याने वार

मुळशी पॅटर्नसारखा पाठलाग करत तरुणावर कोयत्याने वार

पुणे : कात्रज तलावाजवळ तडीपार गुंडाने साथीदारांच्या मदतीने एका तरुणाचा जवळपास एक किलोमीटर पाठलाग करून कोयत्याने सपासप वार केल्याची धक्कादायक घटना घडली.
याप्रकरणी अमित रामदास निंबाळकर (वय २५, रा. गुजर निंबाळकरवाडी) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सागर माने, सुनील राठोड आणि प्रतिक नलावडे, सुरेश मुस्तारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील राठोड हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याला उत्तमनगर पोलिसांकडून शहरातून दोन वर्षांसाठी तडीपार आहे. त्याच्यावर वाहन तोडफोड, आर्म्स ऍक्‍टसह इतर गुन्हे दाखल आहेत. तर, प्रतिक नलावडे याच्यावर येरवडा पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. दोन महिन्यापूर्वी सागर माने व अमित यांच्यात भांडण झाले होते. त्यावेळी माने याला बेदम मारहाण करण्यात आली होती. याचा राग आरोपींच्या मनात होता. त्याचा बदला घेण्यासाठी आरोपींनी कात्रज परिसरात सापळा रचला होता.अमित दुचाकीवरुन जात असताना त्याला रस्त्यात अडवण्यात आले. आरोपींचा इरादा बघून अमित पळू लागताच आरोपींनी त्याचा पाठलाग केला. हा थरार भर रस्त्याच सुरु असताना नागरिक पहात होते. कात्रज तलाव गेट ते राजस सोसायटी गेटपर्यंत त्याचा पाठलाग करण्यात आला. यानंतर त्याच्यावर कोयता व लाकडी दांडक्‍याने वार करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक एस.आर.चिवडशेट्टी करीत आहेत.

error: Content is protected !!
Exit mobile version