मुळशी (टाटा) धरणाचे पाणी पश्चिम महाराष्ट्राला द्या; आमदार ॲड. राहुल कुल यांची अधिवेशनात मागणी

नागपूर, २८ डिसेंबर २०२२ : समुद्रात जाणारे १८७ टी.एम.सी. पाणी वळवून विदर्भ, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्राला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्याचप्रमाणे वीजनिर्मितीनंतर समुद्रात वाहून जाणारे मुळशी (टाटा) धरणाचे पाणी पश्चिम महाराष्ट्रातील काही भागाला दिले तर त्या ठिकाणी नक्कीच क्रांती घडू शकेल. त्यामुळे मुळशी धरणाचे पाणी नैसर्गिक पूर्वेकडे वळविण्याचा निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी केली. यामध्ये समिती तयार करण्यात आली असून, समितीचा निर्णय अद्याप झालेला नाही. त्याबाबत देखील तातडीने निर्णय घ्यावा; तसेच शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी मोठ्या प्रमाणावर रात्रीची वीज देण्यात येते, रात्रीच्या वेळी होणारे बिबट्या व तत्सम प्राण्यांचे होणारे हल्ले लक्षात घेता रात्री देण्यात येणारी वीज दिवसा देण्यात यावी, अशी मागणी आमदार कुल यांनी विधानसभेत केली विधानसभेत केली.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : नीलेश जांबले

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा