गोल पोस्ट आरोग्य मुंबईमधील हेड कॉन्स्टेबल गणेश चौधरी यांचा कोरोनामुळे मृत्यू

मुंबईमधील हेड कॉन्स्टेबल गणेश चौधरी यांचा कोरोनामुळे मृत्यू

मुंबई, दि. २१ मे २०२०: मुंबई मध्ये आणखी एका पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. मुंबई मध्ये आत्तापर्यंत ९ पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत सर्वात जास्त पोलीस कर्मचाऱ्यांचे मृत्यू झाले आहेत. राज्यात आत्ता पर्यंत १२ पोलिस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

मृत पावलेल्या पोलीस कर्मचाऱ्याची नाव गणेश चौधरी असे आहे. मुंबईतील पार्कसाईट पोलीस स्टेशन मध्ये ते हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते. त्यांना ताप येण्यास सुरुवात झाली होती त्यामुळे मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयांमध्ये त्यांना दाखल करण्यात आले होते.

पोलीस महासंचालक व महाराष्ट्र पोलीस दलाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी त्यांच्या कुटुंबियांप्रति सहानुभूती व्यक्त करत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version