मुंबईत तुंबलेल्या पाण्याचे सत्ताधाऱ्यांना उत्तर द्यावेच लागेल – ॲड. आशिष शेलार

मुंबई, दि. १५ जुलै २०२०: देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये प्रत्येक पावसाळ्यात पूर परिस्थिती निर्माण होत असते. मात्र सत्ताधारी कुणीही असो यावर राजकारण करणं कुणीच सोडत नाही. गेली पाच वर्षे भाजपचे देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री होते. त्याअगोदर काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण आणि आता शिवसेनेचे उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. सत्ता कुणाचीही असो पण मुंबईचा प्रश्न काही सुटत नाही.

प्रत्येक पावसाळ्यात मुंबईकरांचे खूप हाल होतात. तरीही यावर कोणताच ठोस उपाय काढला जात नाही. यंदाही मुंबईत जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने अनेक ठिकाणी पाणी साचले होते. त्यामुळे आता याच मुद्यावर पुन्हा राजकारण सुरु झाले आहे. मुंबईतील भाजप नेते ॲड. आशिष शेलार यांनी आता सरकारवर टीका केली आहे.

ॲड. आशिष शेलार यांनी आज एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. त्याचे ते म्हटले कि,
आपल्या मुंबईत तुंबलेल्या पाण्याचे सत्ताधाऱ्यांना उत्तर द्यावेच लागेल. कालपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईची तुंबई झाली आहे. आयुक्त दावा करत होते कि ११३% नालेसफाई झाली आहे . मी तुम्हाला सांगतोय कि तुमचा दावा २२७% फोल आहे. कंत्राटदारांना पाठीशी घालणारे सत्ताधारी आणि अधिकारी हे यामागचे खरे दोषी आहेत. मुंबईकरांचा जीव असुरक्षित करू नका. आजही कंत्राटदारांना पाठीशी घालू नका. मुंबईचे तुंबई करून दाखवलेल्या अधिकाऱ्यांना आणि सत्ताधाऱ्यांना याचे उत्तर द्यावेच लागेल असेही शेलार म्हणाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अक्षय बैसाणे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा