मुंबईचा सलग चौथा विजय; घरच्या मैदाणात हैदराबादला लोळवले

8
MI vs SRH IPL2025 Match Highlights Rohit Sharama Record
मुंबईचा सलग चौथा विजय

MI vs SRH IPL2025 Match Highlights: रोहित शर्माची दमदार 70 धावांची खेळी आणि ट्रेन बोल्ड 4 विकेट्स अन दीपक चाहर 2 विकेट्सच्या जोरावर मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादवर 7 विकेट्सने विजय मिळवला.बुधवारी राजीव गांधी आंतराष्ट्रीय स्टेडियमवर मुंबई आणि हैदराबाद हे संघ आमने- सामने आले होते. या मोसमात मुंबईने सलग चौथा विजय मिळवत पॉइंट टेबलमध्ये सहाव्या स्थानावरुन तिसऱ्या स्थानावर मजल मारली आहे. तर हैद्राबादला पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला आहे.

प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेला सनरायझर्स हैदराबादचा संघ 20 षटकांत केवळ 144 धावा करू शकला. हैदराबादकडून क्लासिन आणि अभिनव मनोहर यांच्याशिवाय कोणालाही चांगली कामगिरी करता आली नाही. मुंबईच्या गोलंदाजांनी हैदराबादच्या फलंदाजाना पॉवरप्लेमध्ये धावा करू दिल्या नाही.हैदराबादने 13 धावांवर 4 विकेट्स गमावले. यानंतर हैदराबाद संघाची गाडी क्लासेन आणि अभिनवने सांभाळली. क्लासेनने 44 चेंडूत 71 धावा केल्या ज्यात 9 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. याशिवाय अभिनवने 37 चेंडूत 43 धावा करत संघाच्या धावसंखेत महत्वपूर्ण योगदान दिली. या दोघांनी मिळून 99 धावांची भागीदारी केली.याच्या जोरावर हैदराबादचा संघ 144 धावणपर्यंत पोहचू शकला.

याशिवाय हैदराबादने दिलेल्या 144 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदनात उतरलेल्या मुंबई इंडियन्सला या धावा करण अवघड नव्हते.मुंबईयची सुरवात चांगली झाली नाही. तरी रोहित शर्माने त्यांना विजयाचे स्वप्न दाखवले आहे. रायन रिकल्टन 11 धावा करून बाद झाला. त्याला जयदेव उनाडकटने बाद केल. पण, रोहित शर्माने त्याच्याच षटकात तूफान फटकेबाजी केली. सलामीवर रोहित शर्मा चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या सामन्यापासून चांगल्याच फॉमात होता.त्यामुळे कालच्या सामन्यात त्याने 70 धावांची दमदार खेळी केली.त्याने टी-20 क्रिकेटमध्ये 12 हजार धावांचा टप्पा ओलांडला.

न्यूज अनकट प्रतिनिधी,प्रथमेश पाटणकर