राज्यात आज मुंबई, गडचिरोली, यवतमाळ जिल्ह्यांना रेड,तर ठाणे, रायगड,पुणे,रत्नागिरीला ऑरेन्ज अलर्ट, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

29

पुणे, २८ जुलै २०२३ : मुंबईसह राज्यभरात काल दिवसभर जोरदार पाऊस झाला. असाच मुसळधार पाऊस आजही (२८ जुलै) सुरु राहणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. भारतीय हवामान विभागाने मुंबई, गडचिरोली आणि यवतमाळ या जिल्ह्यांना २८ जुलैला रेड अलर्ट दिला आहे. तर ठाणे, रायगड, पुणे आणि रत्नागिरी जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच सातारा, नागपूर, गोंदिया, भंडारा, पालघर, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्टचा इशारा दिला गेला आहे.

हवामान विभागाच्या या इशाऱ्यानंतर राज्यातील काही जिल्हा प्रशासनांनी शाळा, कनिष्ठ आणि महाविद्यालयांना २८ जुलैला सुट्टी जाहीर केली आहे. ठाण्यात आज (२८ जुलै) ऑरेन्ज अलर्ट आहे. त्यामुळे ठाण्यात शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर पालघरला असलेल्या ऑरेन्ज अलर्टच्या इशाऱ्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केलली आहे.

रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेन्ज अलर्ट आहे. रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने फक्त शाळांना सुट्टी घोषित केली आहे.रायगड जिल्ह्यालाही ऑरेन्ज अलर्ट असल्याने पहिली ते दहावीच्या शाळांना सुट्टी असणार आहे.राज्यात मुंबई, कोकण, विदर्भात मागील चार ते पाच दिवसापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या ठिकाणी सलग चार दिवस रेड आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. आणि जोरदार पाऊस पडला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा