अबू धाबी २४ सप्टेंबर,२०२० :मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने ४९ धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्स संघातून कर्णधार रोहित शर्मा याची दमदार ८० धावांची खेळी तसेच सूर्यकुमार यादव याच्या अर्धशतकीय खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्स संघाने कोलकाता नाइट रायडर्स संघासमोर १९६ धावांचे बलाढ्य आव्हान ठेवले होते. तसेच कोलकाता नाइट रायडर्स कडून गोलंदाजी करतांना शिवम मावी याने ४ षटकात ३२ धावा देत मुंबई इंडियन्स संघाच्या दोन महत्त्वाच्या फलंदाजांचे विकेट्स घेतल्या. परंतु रोहित शर्माच्या दमदार खेळीमुळे मुंबई संघ १९५ धावा पर्यंत पोहचू शकले.
१९६ धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेले कोलकाता नाइट रायडर्सचे सलामीचे फलंदाज शुभमन गिल आणि सुनील नरेन लवकरच पैविलियन मध्ये परतले. त्यानंतर कर्णधार दिनेश कार्तिक याने ३० धावा आणि राणाने २४ धावा करत इनिंग सांभाळण्याचा प्रयत्न केला पण ते ही स्वस्त:त पैविलियन मध्ये गेले. त्यानंतर कोलकता संघाचा विस्फोटक फलंदाज आंद्रे रसेल याच्यावर सामना जिंकून देण्याची जबाबदारी आली होती. परंतु मुंबईचा गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्या उत्कृष्ट गोलंदाजी समोर आंद्रे रसल आणि मॉर्गन हे स्वस्तात परतले आणि कोलकाता नाइट रायडर्स संघ ९ विकेट्स गमवत फक्त १४६ धावाच करू शकले. आणि मुंबई संघाने ४९ धावांनी विजय मिळवला.विजयाचा शिल्पकार रोहित शर्मा हा ” मॅन ऑफ द मॅच” ठरला. या विजयासोबत मुंबई इंडियन्स आता पॉइंट्स टेबल मध्ये प्रथम स्थानी आले आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अंकुश ढावरे