आयपीएल सुरू होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सला धक्का; जसप्रीत बूमहराह सामन्यांना मुकणार

Jasprit Bumrah Jasprit Bumrah Not Plying IPL 2025
आयपीएल सुरू होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सला धक्का

Jasprit Bumrah not Playing IPL : आयपीएलचा हंगाम सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस राहिले असतानाच पाच वेळा आयपीयल विजेत्या मुंबई इंडियन्स संघाला मोठा धक्का बसला आहे. मुंबईचा प्रमुख आणि स्टार गोलंदाज जसप्रीत बूमहाराह दुखापतीमुळे आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांना मुकणार आहे. बूमराह एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मैदानात पुनरागमन करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांमध्ये सुद्धा नाराजी निर्माण झाली आहे.

भारत ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या सिडनी कसोटीच्या दुसऱ्या दिवशी जसप्रीत बूमराहला दुखापत झाली होती. त्यामुळे सामना सुरू असतानाच त्याला मैदान सोडून जावे लागले होते. त्यामुळे दुसऱ्या डावात सुद्धा त्याला गोलंदाजी करता आली नाही. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत त्याने सर्वाधिक ३२ विकेट्स घेतले होते. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या संघाच्या संभाव्य यादीत सुद्धा जसप्रीत बूमराहला स्थान देण्यात आले होते. पण अखेरच्या क्षणी त्याला वगळण्यात आले.

भारत आणि इंगलंड कसोटी मालिका

भारतीय संघ आयपीएल झाल्यानंतर इंग्लंड संघाशी कसोटी मालिका खेळणार आहे. त्यांच्यात जून महिनात ही मालिका खेळवली जाणार आहे. अशी सूत्रांकडून माहिती देण्यात आली असून दोन्ही उभय संघात पाच सामन्याची मालिका होणार आहे. या मालिकेत जसप्रीत बूमराहचे असणे खूप महत्वाचे असणार आहे. कारण या मालिकेनंतर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला प्रारंभ होणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी, प्रथमेश पाटणकर