मुंबई इंडियन्सचा सलग तिसरा विजय, सनरायझर्स हैदराबादचा १४ धावांनी केला पराभव

हैदराबाद, १९ एप्रिल २०२३: आयपीएलमध्ये मंगळवारी झालेल्या रंगतदार सामन्यात मुंबई इंडियन्स १४ धावांनी सनराईज हैदराबादचा पराभव करत सलग तिसरा विजय मिळवला. हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात सनराईज हैदराबादने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर मुंबईने हैदराबादसमोर १९३ धावांचे लक्ष ठेवले होते. मात्र विजयाचा पाठलाग करताना हैदराबादला १४ धावांनी पराभव पत्करावा लागला.

हैदराबादने या सामन्यात झुंज दिली आणि विजयाच्या जवळ आले, पण विजय मिळवता आला नाही. मुंबईला शेवटच्या षटकात २० धावा वाचवायच्या होत्या. अशा परिस्थितीत रोहितने ह्या धाव वाचवण्याची जबाबदारी अर्जुन तेंडुलकरवर सोपवली. तसेच अर्जून टेंडूलकरने शेवटच्या षटकात एक महत्वाची विकेट घेत स्वतःचे खाते उघडले.

मुंबईने हैदराबादसमोर १९३ धावांचे आव्हान ठेवले होते. हैदराबाद संघ १९.५ षटकांत १७८ धावा करून गडगडला. अर्जुनने शेवटच्या षटकात केवळ पाच धावा देत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. शेवटचे षटक टाकणे सोपे नाही. या शेवटच्या षटकात खूप दडपण आहे. पण अर्जुनने या शेवटच्या षटकाचे दडपण चांगले हाताळले आणि अचूक लाईन लेंथने गोलंदाजी केली. त्याने प्रत्येक चेंडू यॉर्करला प्लॅनमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला आणि त्यात तो यशस्वीही झाला. अर्जुनने शेवटच्या षटकात ज्या पद्धतीने गोलंदाजी केली त्याने सर्वांनाच प्रभावित केले.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा