१४ ऑगस्ट पासून सर्वसामान्यांसाठी धावणार मुंबईची लोकल !

मुंबई, दि. १७ जुलै २०२०: कोरोनाच्या काळात मुंबईकरांना लाॅकडऊनमधे अनेक हाल आपेष्टांचे जीवन जगावे लागत आहे. अर्थात हि अशी मुंबईची नाही तर संपूर्ण जगाचीच व्यथा करोनाने करुन ठेवली आहे. अशातच मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी आली आहे.

मुंबईची शान आणि लाईफ लाईन असलेली लोकल सर्वसामान्यांसाठी १४ ऑगस्ट रोजी सुरु करण्याचा विचार केंद्र करत आसल्याची माहिती पालक मंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे. अत्यावश्यक सेवेमधे मुंबईची लाईफ लाईन हि फक्त प्रशासकीय तसेच अरोग्य कर्मचार्यांसांठी धावत आहे. तरी तिची सेवा हि पुर्ण कामी पडत नसल्याने फेऱ्या या वाढवण्यात देखील आल्या.

अत्यावश्यक सेवेसाठी लोकल या धावत असल्या तरी मुंबईकरांनी लोकलसाठी बनविलेल्या नियमाचें पालन करत संपुर्ण महाराष्ट्रासमोर एक आदर्श ठेवला आहे.
या आधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २ वेळा केंद्राकडे लोकल सर्वसामान्यांसाठी चालू करायची मागणी केली होती.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा