मुंबई, 21 सप्टेंबर 2021: अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा याला अखेर जामीन दिलासा मिळाला आहे. मुंबईतील मॅजिस्ट्रेट कोर्टानेकडून राज कुंद्राला जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यासोबत कुंद्राच्या कंपनीचा आयटी प्रमुख रायन थॉर्प यालाही जामीन मंजूर करण्यात आला आहे. 50 हजारांच्या जातमुचलक्यावर न्यायालयाने राज कुंद्राला जामीन मंजूर केलाय. 19 जुलैला मुंबई पोलिसांनी राज कुंद्राला अटक केली होती.
गुन्हे शाखेने पुरवणी आरोपपत्र दाखल केल्यानंतर राज कुंद्रा याने पुन्हा जामिनासाठी अर्ज केला होता. पुरवणी आरोपपत्रात माझ्याविरोधात काहीच पुरावा नाही, असा दावा करत कुंद्राने जामीन देण्याची केली होती विनंती. कुंद्रा याची विनंती मान्य करत कोर्टाने त्याला 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.
पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्रा जुलैपासून अटकेत आहे. पोलिसांच्या चैकशीत राज कुंद्राविरोधात अनेक पुरावे हाती लागल्याने राज कुंद्राच्या न्यायालयिन कोठडीत वाढ होत गेली. राज कुंद्रासह चार आरोपींविरोधात मुंबई पोलिसांनी दीड हजार पानांचं आरोपपत्र दाखल केलंय. कुंद्रा हा पॉर्नोग्राफी प्रकरणात मुख्य सूत्रधार असल्याचे पुरावे गुन्हे शाखेला मिळाले आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे