बनावट टीआरपी प्रकरणातील अर्णब गोस्वामीवर मुंबई पोलिसांकडून आरोपपत्र दाखल

मुंबई, २३ जून २०२१: रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्या बनावट टीआरपी प्रकरणात अडचण वाढताना दिसत आहेत. मुंबई पोलिसांनी अर्नबला सप्लीमेंट्री चार्जशीट मध्ये आरोपी बनविले आहे. या प्रकरणावरून त्यांना या आधी अटक देखील करण्यात आली होती. चौकशी नंतर त्यांना सोडण्यात आले होते.

मुंबई पोलिसांनी ९ महिन्यांपूर्वी याप्रकरणी एफआयआर नोंदविला होता. तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी अर्णब गोस्वामी यांनाही या घोटाळ्यामध्ये सामील असल्याचे सांगितले होते. आरोपपत्रात पोलिसांनी अर्णबसह पाच जणांची नावे दिली आहेत. अर्णब व्यतिरिक्त एआरजी आउटलेटर मीडिया मधील चार लोकांची नावे आहेत. पोलिसांनी कोर्टात दाखल केलेल्या १८०० पानांच्या आरोपपत्रात याचा उल्लेख केला आहे.

या प्रकरणात सह आरोपी म्हणून सीओओ प्रिया मुखर्जी, शिवेंद्रू मुळेकर, शिव सुंदरम अशीही नावे आहेत. ज्यांना यापूर्वी वाँटेड जाहीर केले होते. आतापर्यंत पोलिसांनी १५ लोकांविरूद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. ज्यामध्ये बीएआरसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दास गुप्ता आणि रिपब्लिक टीव्हीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास खानचंदानीही सहभागी आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा