बनावट व्ह्यूजच्या बाबतीत मुंबई पोलिसांनी बादशहाला बजावले समन्स

मुंबई, ७ ऑगस्ट २०२०: सोशल मीडियावर स्वतःला प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी सध्या सर्वच सेलिब्रिटी मध्ये ओढ लागली आहे. लाईक्स, व्ह्यूज, फॉलोवर्स या गोष्टींसाठी चढाओढ सुरू आहे. आधुनिक युगात फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि यूट्यूब सारखे प्लॅटफॉर्मही सेलेब्ससाठी प्रवर्तक म्हणून उदयास आले आहेत. मात्र काही सेलिब्रिटी वर बनावट व्ह्यूज आणि फॉलोवर्ससाठी आरोप करण्यात आले आहेत. यासंदर्भात मुंबई पोलिसांनी बॉलिवूड रॅपर बादशाहलाही समन्स बजावले होते.

वास्तविक, मागील महिन्यात सीआययूने एका रॅकेटचा पर्दाफाश केला ज्यामध्ये बनावट व्ह्यूज आणि बनावट फॉलॉवरस बरेच सेलिब्रिटींकडून खरेदी केले जात होते. मुंबई पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन केल्याप्रकरणी एका प्रकरणाचा खुलासा केला होता. यात सेलिब्रिटी आणि बॉलिवूड मध्ये काही मोठ्या कंपन्या इन्स्टाग्राम, ट्विटर आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बनावट फॉलोअर्स खरेदी करत होत्या.

या प्रकरणातील तपासादरम्यान, बादशहाच्या इन्स्टाग्राम अकाउंट वरील बैडबॉयशाह हे नावही क्राइम इंटेलीजेंस यूनिटच्या (सीआययू) यादीमध्ये आले आणि सीआययूने त्याला ३ ऑगस्ट रोजी समन्स बजावले, परंतु बादशहा जाण्यास असमर्थ ठरला. त्यानंतर त्याला पुन्हा एकदा सीआययूच्या अधिकाऱ्यांनी काल सहा ऑगस्ट रोजी बोलावले होते. असे मानले जाते की या प्रकरणात बॉलिवूडच्या काही मोठ्या व आघाडीच्या अभिनेत्रींकडेही चौकशी केली जाऊ शकते.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा