अहमदाबाद, ११ ऑक्टोंबर २०२३ : अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमला बॉम्ब हल्ल्याची धमकी देण्यात आली आहे. तास मुंबई पोलिसांना मेल पाठवण्यात आला आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर क्रिकेट विश्वचषकाचे बहुतेक सामने आयोजित केले गेले आहेत. या धमकीच्या मेलमध्ये सरकारकडे ५०० कोटी रुपये आणि कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईला सोडण्याची मागणीही करण्यात आली आहे.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर १४ ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट विश्वचषक सामना खेळवला जाणार आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, अज्ञातांनी स्टेडियममध्ये स्फोट होईल असा दावा करणारा ईमेल पाठवला होता. मात्र, त्याबाबत सविस्तर खुलासा करण्यात आलेला नाही.
भारत-पाक सामना पाहता स्टेडियममध्ये मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. गुजरात पोलीस, एनएसजी, आरएएफ आणि होमगार्डसह विविध एजन्सींचे ११,००० हून अधिक कर्मचारी १४ ऑक्टोबर रोजी भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यादरम्यान अहमदाबाद आणि नरेंद्र मोदी स्टेडियमवर तैनात केले जातील, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सोमवारी सांगितले.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड