मुंबई पोलिसांनी ‘गोल्डन अवर’मध्ये वाचविले ४४ लाख

9

मुंबई, २५ डिसेंबर २०२२ : सायबर ठगाने ई-मेलच्या माध्यमातून एका कंपनीच्या संचालकाला गंडा घालून ४४ लाख लंपास केले खरे; पण हा फसवणुकीचा प्रकार वेळीच संचालकांच्या लक्षात आला आणि त्यांनी मुंबई पोलिसांच्या सायबर हेल्पलाईनला कॉल केला. सायबर पोलिसांनीही जलद गतीने कारवाई करीत ‘गोल्डन अवर’मध्ये ४४ लाख रुपये परत मिळविले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी (ता. २४) यातील तक्रारदार यांनी १९३० या सायबर हेल्पलाईन नंबरवर कॉल करून ते संचालक असलेल्या टेक्स्टाईल कंपनी आणि त्यांची व्यावसायिक भागीदारी कंपनी यांच्यामधील व्यावसायिक ई-मेल संभाषणादरम्यान अज्ञात व्यक्तीने चुकीच्या बँक खात्यावर इंटरनेट बँकिंगद्धारे ४४ लाख ४३ हजार २७९ रुपये पाठविण्यास भाग पाडले असल्याची तक्रार दिली.

त्यानुसार सायबर हेल्पलाईन कक्षातील पोलिस उपनिरीक्षक मंगेश भोर, फौजदार बुरुमकर आणि बाबरे यांनी तत्काळ एनसीआरपी पोर्टलवर तक्रार दाखल करून सबंधित बँकेच्या नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क साधत सायबर फसवणुकीची संपूर्ण रक्कम कॅनरा बॅंक खात्यावर होल्ड केली आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा