मुबंई – पुणे एक्सप्रेस महामार्गावर ट्रकने घेतला पेट

मुंबई:  मुबंई पुणे एक्सप्रेस वेवर ट्रक ने पेट घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा पेटता ट्रक पुलावरून खालच्या रस्त्यावर आदळला. ताकई ते आडोशी दरम्यानच्या पुलावर हा अपघात घडला. अग्निशमन यंत्रणा घटनास्थळी पोहोचली असून बचावकार्य वेगाने सुरु आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही. त्यामुळे मुंबईकडे येणारी वाहतूक थांबवण्यात आलेली आहे.अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

मुंबई-पुणे एक्सप्रेसवर मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प झाली आहे. पुण्याकडे जाणारी वाहतूक सुरळीत सुरु आहे. मुंबईकडे येणारी वाहतूक थांबवण्यात आली आहे. मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर तीन ते चार किलोमीटरच्या रांगा लागल्या आहेत. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर एका टँकरला प्रथम आग लागली. या टँकरमध्ये रसायन होते. या आगीची झळ बसून एका ट्रकने पेट घेतला आणि तो ट्रक खाली कोसळला. टँकरला लागलेल्या आगीमुळे एक्सप्रेस वे वरील वाहतुकीस अडथळा निर्माण झाला.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा