गोल पोस्ट महाराष्ट्र मुंबई मुंबई-पुणे महामार्गावर लालपरीत वाढ .

मुंबई-पुणे महामार्गावर लालपरीत वाढ .

मुंबई: मध्य रेल्वेवरील कर्जत येथे तांत्रिक कामामुळे मुंबई पुणे मार्गावरील अनेक एक्सप्रेस रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून एसटी महामंडळाने ७० पेक्ष्या जास्त बसगाड्यांची व्यवस्था केली आहे. सध्या रेल्वेवर मंकी हिल ते कर्जत स्थानकादरम्यान तांत्रिक काम करण्यात येणार असल्यामुळे ३० नोव्हेंबर पर्यंत लांब पल्ल्यांच्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यात मुंबई पुणे प्रगती एक्स्प्रेस चा ही समावेश आहे. रेल्वेच्या या कामामुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी महामंडळाने आपल्या बसगाड्यांची फेरी वाढवण्यासाठी ७० अतिरिक्त बस गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version