मुंबईचा महापौर कोण ?

29

मुंबई: मुंबईच्या महापौर पदासाठी दावा करण्यासाठी शिवसेनेकडून यशवंत जाधव आणि किशोरी पेढणेकर या तुल्यबळ नगर सेवकांमध्ये चुरस पाहायला मिळत आहे. यशवंत जाधव यांच्या पाठोपाठ किशोरी पेढणेकर यादेखील मातोश्रीवर दाखल झाल्याचे समजले आहे.

शिवसेनेसाठी ही महापौर पदाची निवडणूक महत्वाची आणि प्रतिष्ठेची आहे. तर दुसरीकडे महाशिवघाडीत कोंग्रेस शिवसेनेसोबत राहील का याची शंका वर्तवण्यात येत आहे. मात्र शिवसेनेकडून तुल्यबळ नगरसेवक म्हणजेच स्थायी समिति अध्यक्ष यशवंत जाधव यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जात होते. त्याच बरोबर यशवंत जाधव हेच महापौर असतील असे ही शिवसेनेध्या नागर्सेवकांकडून संगितले जात होते. मात्र यशवंत जाधवांच्या पाठोपाठ किशोरी पेढणेकर यांना ही मातोश्रीवर बोलवण्यात आले. महापौर पद कोणाला दिल जाणार किवा महापौर पदाचा फॉर्म कोण भरणार हे ही गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा