मुंबईच्या महापौरपदी किशोरी पेडणेकर बिनविरोध

उपमहापौरपदी सुहास वराडकर

मुंबई : मुंबईच्या महापौरपदी किशोरी पेडणेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर उपमहापौरपदी सुहास वराडकर यांची निवड करण्यात आली आहे.
किशोरी पेडणेकर यांची बिनविरोध निवड झाली असली तरीही शिवसेनेच्या गोटात काहीसा नाराजीचा सूर असल्याची चर्चा आहे. आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदासंघातील प्रचारात त्यांचा मोलाचा वाटा होता.

महिलांना एकत्र आणण्यापासून ते मतदारांच्या घरोघरी जाऊन संपर्क साधण्यापर्यंत त्यांची मोलाची कामगिरी होती. त्यांच्या या मेहनतीला अखेर यश मिळाले आहे.

किशोरी पेडणेकर यांचा जन्म एका गिरणी कामगाराच्या घरात झाला. विवाहानंतर न्हावा शेवा इथल्या रुग्णालयात त्या परिचारीका म्हणून सुरुवातीला काम करत होत्या. त्यातून त्यांना समाजकार्याची गोडी निर्माण झाली. त्यांनी शिवसेना संघटनेसोबत काम करण्याचं ठरवले. त्यांनी सेनेकडून लोअर परळ, वरळी आणि आसपासच्या भागांमध्ये शिवसेनेकडून काम करण्यास सुरुवात केली.त्यानंतर उपविभाग संघटक ते नगरसेवक अशा वेगवेगळ्या पदांवर त्यांनी कामे केलेली आहेत.
त्यांनी २००२ मध्ये पहिल्यांदा निवडणूक लढवून नगरसेवक म्हणून पालिकेवर निवडून आल्या होत्या. त्यांनी बालकल्याण आणि स्थापत्य समिती शहर अध्यक्षपदासाठी काम केले आहे. त्यानंतर पुन्हा २०१२आणि २०१७ रोजी किशोरी पेडणेकर यांची नगरसेवक म्हणून निवड झाली होती. राजकारणातून समाजकारण करण्याचा त्यांचा मानस आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा