मुंबईचा सलग 8वा पराभव, आयपीएलमधून जवळपास बाहेर, लखनौ 36 धावांनी विजयी

MI VS LSG, 25 एप्रिल 2022: पाच वेळचा चॅम्पियन संघ मुंबई इंडियन्स (MI) IPL 2022 मधून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे. 24 एप्रिल रोजी लखनौ सुपर जायंट्स (LSG) विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव झाला. या मोसमात मुंबईचा हा सलग आठवा पराभव असून त्यांनी आतापर्यंत एकही सामना जिंकलेला नाही. अशा स्थितीत मुंबईला प्ले ऑफमध्ये स्थान मिळवणे आता अशक्य आहे.

कर्णधार केएल राहुलच्या शानदार शतकामुळे (103*) लखनौ सुपर जायंट्सने या सामन्यात 168 धावा केल्या. पण मुंबई इंडियन्सला ही धावसंख्या गाठता आली नाही, रोहित शर्मा-तिलक वर्मा-कीरॉन पोलार्डच्या छोट्या खेळीनंतरही संघाला 36 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले.

मोसमातील आठही सामने हरणारा मुंबई इंडियन्स पहिला संघ ठरला आहे. आता या मोसमात मुंबई इंडियन्सचे एकूण 6 सामने बाकी आहेत, मात्र केवळ 12 गुणांसह प्ले ऑफमध्ये पोहोचणे कठीण आहे.

मुंबई इंडियन्स डाव- (132/8, 20 षटके)

या सामन्यातही मुंबई इंडियन्सची सुरुवात खराब झाली, खराब फॉर्मशी झुंजत असलेला इशान किशन विचित्र पद्धतीने अवघ्या 8 धावा करून बाद झाला. कर्णधार रोहित शर्मा काहीशा रंगात दिसला आणि त्याने शानदार फटके मारले पण त्यालाही केवळ 39 धावा करता आल्या. रोहित-इशानशिवाय डेवाल्ड ब्रेव्हिस (34 धावा), सर्यकुमार यादव (७ धावा) यांना दुहेरी आकडाही स्पर्श करता आला नाही.

पहिली विकेट – इशान किशन 8 धावा (49/1)
दुसरी विकेट – डेवाल्ड ब्रेव्हिस, 3 धावा (54/2)
तिसरी विकेट – रोहित शर्मा 39 धावा (58/3)
चौथी विकेट- सूर्यकुमार यादव 7 धावा (67/4)
पाचवी विकेट- टिळक वर्मा 38 धावा (124/5)
सहावी विकेट- किरॉन पोलार्ड 19 धावा (131/6)
सातवी विकेट – जयदेव उनाडकट 1 धाव (132/7)
आठवी विकेट – डॅनियल सॅम्स 3 धावा, (132/8)

केएल राहुलने झळकावले शानदार शतक

लखनौच्या इनिंगचा स्टार पुन्हा एकदा कर्णधार केएल राहुलने मुंबईच्या गोलंदाजांवर कहर केला. केएल राहुलने या मोसमातील दुसरे शतक झळकावले असून दोन्ही शतके मुंबई इंडियन्सविरुद्ध झळकावली आहेत. राहुलने आपल्या डावात 103 धावा केल्या आहेत.

यावेळी क्विंटन डी कॉक लवकर बाद झाला आणि त्याला 4 धावांवर जीवदानाचा फायदा उठवता आला नाही. त्याच्यानंतर मनीष पांडे (22 धावा) कर्णधार केएल राहुलसोबत खेळला, पण त्याला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.

मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करणाऱ्या लखनऊ ला पोलार्डने धक्का दिला आणि त्याने लगेचच दोन गडी बाद केले. लखनौची मधली फळी फसली आणि मार्कस स्टॉइनिस, कृणाल पांड्या, दीपक हुडा यांना मोठा डाव खेळता आला नाही.

पहिली विकेट – क्विंटन डी कॉक 10 धावा, (27/1)
दुसरी विकेट – मनीष पांडे 22 धावा (85/2)
तिसरी विकेट – मार्कस स्टॉइनिस 0 धावा, (102/3)
चौथी विकेट- कृणाल पांड्या, 1 धाव (103/4)
पाचवी विकेट- दीपक हुडा 10 धावा (121/5)
6वी विकेट – आयुष बडोनी 14 धावा (168/6)

लखनौ सुपर जायंट्स प्लेइंग-11: क्विंटन डी कॉक, केएल राहुल, मनीष पांडे, क्रुणाल पांड्या, दीपक हुडा, आयुष बडोनी, मार्कस स्टॉइनिस, जेसन होल्डर, दुष्मंथा चमिरा, रवी बिश्नोई, मोहसिन खान

मुंबई इंडियन्स प्लेइंग-11: रोहित शर्मा, इशान किशन, डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, किरॉन पोलार्ड, हृतिक शोकीन, डॅनियल सॅम्स, जयदेव उनाडकट, रिले मेरेडिथ, जसप्रीत बुमराह

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा