यावर्षी सुद्धा मुंबईची पहिली मॅच देवालाच ;चेन्नईने चेपॉकवर मिळवला विजय

34
CSK vs MI IPL 2025 Frist Match MI vs CSK WIN
मुंबईची पहिली मॅच देवालाच ;चेन्नईने चेपॉकवर मिळवला विजय

CSK vs MI IPL 2025 Highlight: दरवर्षी प्रमाणे यंदाही मुंबई इंडियन्सने यंदाच्या आयपीएलचा पहिला सामाना गमावला आहे. चेन्नई सुपर किंग्सने मुंबईचा ४ विकेट्सने पराभव केला आहे. काल चेपॉकवर खेळवण्यात आलेल्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतेला. हंगामच्या पहिल्याच सामन्याची सुरुवात मुंबई संघासाठी खराब राहिली. प्रथम मैदानात फलंदाजी करण्यासाठी मुंबई इंडियन्सचा संघ मैदानात उतरला मात्र, मुंबईचे सलामीवीर लवकर बाद झाले. त्यामुळे २० षटकांत मुंबई इंडियन्सचा संघ अवघ्या १५५ धावाचा आकडा गाठू शकला.

जरी मुंबईने १५५ धावा केल्या असल्या तरी त्यांनी चेन्नईला सहज विजय मिळवून दिला नाही. मुंबईने अखेरच्या षटकापर्यंत चेन्नईला विजयासाठी वाट पाहायला लावली. शेवटच्या षटकात चेन्नईला विजयासाठी ६ चेंडूत ४ धावांची गरज असताना रचिनने पहिल्याच चेंडूवर षटकार लगावत संघाला विजय मिळवून दिला. जारी मुंबई इंडियन्स संघाने मोठी धावसंख्या उभारली नसली, तरी त्यांनी शेवट पर्यंत हार मानली नाही. काल झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा तरुण खेळाडू विघ्नेश पुथूरने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. त्याने ४ षटकांत ३२ धावा देत ३ महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या.

१५५ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या चेन्नई सुपर किंग्स संघाची सुरुवात सुद्धा चांगली राहिली नाही. राहुल त्रिपाठी दुसऱ्या षटकातच बाद झाला. पण यानंतर ऋतुराज गायकवाडने चेन्नईची गाडी पुढे नेली.त्याने आयपीएल कारकिर्दीतील सर्वात जलद अर्धशतक झळकावत मुंबई इंडियन्सवर दबाव आणला.ऋतुराज गायकवाडने २६ चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकारांसह ५३ धावा करून बाद झाला.

न्यूज अनकट प्रतिनिधी, प्रथमेश पाटणकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा