मुंबईतील नाट्यगृहांमध्ये यापुढं मोबाइल ‘जॅम’

मुंबई: अनेक नाट्यनिर्मात्यांनी प्रयोगाच्या वेळी नाट्यगृहात मोबाइल जॅमर लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रेक्षकांनी त्यास विरोध दर्शवला. मोबाइलच्या सततच्या अडथळ्यानं नाटकवाले वैतागले होते. अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही व्यथा मांडली होती. नाटक पाहायला जात असाल तर एक लक्षात ठेवा. महत्त्वाचे कॉल, मेसेज आधीच करून घ्या. कारण, यापुढं नाट्यगृहात प्रवेश केल्यावर तुम्हाला मोबाइलवर बोलता येणार नाही. कारण, नाट्यगृहात जॅमर बसविले जाणार आहेत. मुंबई महापालिकेनं त्यासाठी मान्यता दिली आहे.
नाटक सुरू असताना प्रेक्षकांपैकी कुणाचा तरी मोबाइल वाजणं आणि त्यामुळं सर्वांचाच रसभंग होणं हे प्रकार सातत्यानं होत होते. नाटकापूर्वी उद्घोषणा करून, कलाकारांनी विनंती करूनही फारसा फरक पडताना दिसत नव्हता. त्यांची ही व्यथा लक्षात घेऊन नाट्यगृहात जॅमर बसवले जावेत, अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी महापालिका सभागृहात केली होती. ही मागणी महापालिकेनं मंजूर केली आहे. अर्थात, या काळात काही आणीबाणीची परिस्थिती उद्भवल्यास त्याची जबाबदारी निर्माते, संस्था व आयोजकांची असेल, असंही स्पष्ट करण्यात आल्याचं समजतं.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा