पुण्यातील जलप्रदुषणाला पाटबंधारे विभागासह पालिकाही जबाबदार; खासदार सुप्रिया सुळे

कात्रज, २१ मे २०२३: जांभूळवाडी तलावातील जलप्रदुषणामुळे झालेल्या लाखो माशांच्या मृत्यूला पाटबंधारे विभागासह महापालिका प्रशासनही जबाबदार आहे. तलाव परिसरातील अतिक्रमणे, मेलायुक्त पाणी, जलपर्णी आणि जलप्रदुषण रोखण्यासाठी दोन्ही प्रशासनांनी संयुक्तपणे उपाययोजना कराव्यात. याबाबत दर पंधरा दिवसांनी आणि आढावा बैठक घेऊन तलावाचे प्रश्न सोडवावेत, असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

जांभुळवाडी तलावातील जलप्रदुषणामुळे लाखो माशांचा तडफडून मृत्यू झाला. यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. तसेच राजीव गांधी प्राणीसंग्रहालयतील कात्रज तलावातील जलपर्णीमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. या पाश्र्वभूमीवर सुळे यांनी दोन्ही तलावांची पाहणी केली. यावेळी माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, माजी नगरसेवक प्रकाश कदम, पाटबंधारे विभागाचे अधिकारी सर्वजण उपस्थित होते.

प्राणीसंग्रहालयतील तलावामधील जलपर्णी काढण्याचे काम ८० टक्के पूर्ण झाल्याने डासांचा प्रादुर्भाव कमी झाला असून, तलावातील मेलायुक्त पाणी रोखण्यासाठी एसटीपी प्लॅट बसविण्याचे काम लवकर पूर्ण करावे दूषित पाणी सोडून गाळ काढण्यात येणार आहे. यांची माहिती पाटबंधारे विभागाचे अधीक्षक प्रकाश कदम यांनी दिली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा