मुरलीधर मोहोळ यांचा लॉकडाऊन शिथिलतेला विरोध

पुणे, दि. ४ मे २०२०: पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी लॉकडाऊनला दिलेल्या शिथिलतेला विरोध केला आहे. लोकडाऊन पूर्वीप्रमाणेच सुरू ठेवा अन्यथा धोका आहे अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. केवळ अत्यावश्यक सेवा या १० ते २ या वेळेत सुरू ठेवण्याची मागणी त्यांनी केली आहे. या निर्णयामुळे पुण्यातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. याच्या पार्श्वभूमीवर महापौर मोहोळ यांनी पालकमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केली आहे.

पुण्यामध्ये ३ -या लॉकडाऊन मध्ये वेगवेगळ्या गोष्टींना मुभा देण्यात आली त्यात सगळ्यात महत्त्वाचा भाग होता तो म्हणजे वेळेचा. आधी ही वेळ दहा ते दोन होती ती आता दहा ते सहा करण्यात आली आहे. त्यामुळे पुण्यामध्ये लोक मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. त्यामुळे सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडालेला दिसत आहे.

महापौर मोहोळ म्हणाले की, ‘पोलीस प्रशासन आणि मनपा प्रशासन यांच्या माध्यमातून काही आदेश काढले गेले आणि त्यामध्ये आजपासून कंटेनमेंट एरिया सोडून लॉकडाऊन शिथील करण्यात आले आहे. याचे खूप मोठे परिणाम आपल्याला पाहायला मिळत आहे. यात सोशल डिस्टंसिंगचे कोणीही पालन करत नाही. यामुळे महापौर मोहोळ यांनी पोलीस आयुक्तांना विनंती केली आहे तसेच पालकमंत्री अजित पवार यांच्याशी हि चर्चा करून त्यांना विनंती केली आहे. अजित पवार यांच्याकडून सकारात्मक उत्तर मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा