पिंपरी चिंचवड , २ ऑगस्ट २०२० : प्रेम एक अशी भावना आहे ज्यामध्ये व्यक्ती एकदा गुरफटला की एक तर तो चांगल्या मार्गी लागतो अथवा प्रेम अयशस्वी झाले तर गुन्हेगारी पर्यायाचा अवलंब करतो. याला काही आपवाद देखील असतात. पण सध्या रोज एकतर्फी प्रेमातून घडणा-या घटनांमधे वाढ झाल्याचे दिसत आहे. मागेच एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने एका तरूणीचा गळा चिरुन हत्या केली होती. तर आता अशीच एक घटना समोर आली आहे.
पिंपरी चिंचवड मधील एका विवाहित तरुणाने एका विवाहित तरुणीचा भर रस्त्यात चाकू भोसकून खून केला आहे. घडला प्रकार हा एकतर्फी प्रेमातून घडल्याचे सांगितले जात आहे. तसेच खुनानंतर आरोपी शेषाराव गाडे या तरुणाने देखील आहत्महत्येचा प्रयत्न केला असून त्याची प्रकृती हि चिंताजनक आहे. तर तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे.
घडलेला प्रकार पिंपरी चिंचवड मधील चिखली परिसरातला असून यामुळे शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर पुढील तपास हे पोलिस करत आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी