गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा खाडवी येथे किरकोळ वादातून २५ वर्षीय तरुणाचा खून

खाडवी येथे किरकोळ वादातून २५ वर्षीय तरुणाचा खून

कर्जत, दि. २६ मे २०२०: कर्जत तालुक्यातील खाडवी येथे किरकोळ वादातून आण्णासाहेब मच्छिंद्र तापकीर वय वर्षे २५ या तरूणाचा खून करण्यात आला आहे.

या प्रकरणी सविस्तर वृत्त असे की, खाडवी येथील तापकीर कुटुंबामध्ये किरकोळ कारणामुळे वाद-विवाद झाले होते. या नंतर दोन्ही कुटुंबानी परस्पर विरोधी तक्रारी दिल्या होत्या या तक्रारीचा मनात राग घेऊन दिनांक २४ मे रोजी सकाळी ८ वाजता दगड आणि काठ्यांच्या साहाय्याने मारहाण करण्यात आली. या मारहाणीत काकासाहेब मच्छिंद्र तापकीर हा युवक गंभीररित्या जखमी झाला. त्या नंतर त्याला अहमदनगर येथे उपचारासाठी खाजगी दवाखानात नेण्यात आले होते. या वेळी उपचार चालू असताना या युवकाचे निधन झाले .

या प्रकरणात फिर्यादीने तक्रार दिली आहे की, या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार करून देखील पोलिसांकडून याबाबत कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती. या खूनामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष

error: Content is protected !!
Exit mobile version