गोल पोस्ट महाराष्ट्र नागपूर नागपुर जवळील चांपा गावात प्रॉपर्टी डिलरची हत्या, खून करून पार्टनर पसार

नागपुर जवळील चांपा गावात प्रॉपर्टी डिलरची हत्या, खून करून पार्टनर पसार

नागपूर २२ जानेवारी २०२४ : रविवारी दूपारी नागपुर जिल्ह्यातील कुही पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या चांपा गावात गोंटू बोद्रे नामक ३५ वर्षीय इसमाची हत्या करण्यात आली. भरदूपारी झालेली ही हत्या गोंटूच्या पार्टनरनेच प्रॉपटीच्या वादातून केली असल्याचे सुत्राकडून कळते. मृत गोंटू बोद्रे आणि आरोपी सचीन फेंडारकर वय वर्ष ३५ हे दोघे प्रॉपर्टी डिलींगचा बिजनेस करत होते. त्यां दोघात बिजनेसमुळेच वाद झाला होता. वाद इतका विकोपाला गेला की सचीनने गोंटूची धारदार शस्राने हत्या केली व तो पसार झाला.

गोंटू हा नागपूर शहरातील दिघोरी परिसरातील गणेश अपार्टमेंट येथे राहतो. तर सचीन हा मुळचा भंडारा जिल्ह्यातील असून तो सध्या नागपूर शहरात वास्तव्यास आहे. कुही पोलीस तसेच नागपूर ग्रामीण गुन्हे शाखेचे पोलीस समांतर तपास करत आहेत. स्थानीक गुन्हे शाखा तसेच कुही पोलीसांचे तपास पथक आरोपीचा शोध घेण्यास रवाना झाले आहेत. आरोपी मिळाल्यानंतर हत्येमागील खरे कारण पुढे येईल, असे पोलीसांनी सांगीतले.

न्युज अनकट प्रतिनिधी : नीता सोनावणे

error: Content is protected !!
Exit mobile version