गोल पोस्ट गुन्हा तिहार जेलमध्ये गँगस्टर टिल्लू ताजपुरियाची हत्या ; रोहिणी कोर्ट गोळीबारात होता मुख्य...

तिहार जेलमध्ये गँगस्टर टिल्लू ताजपुरियाची हत्या ; रोहिणी कोर्ट गोळीबारात होता मुख्य आरोपी

नवी दिल्ली, २ मे २०२३: दिल्लीच्या रोहिणी कोर्ट गोळीबारातील आरोपी असलेल्या गँगस्टर टिल्लू ताजपुरियाची तिहार जेलमध्ये हत्या करण्यात आली आहे. प्रतिस्पर्धी टोळीने टिल्लू यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला. हल्ल्यानंतर त्याला दीनदयाळ उपाध्याय रुग्णालयात नेण्यात आले. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. आज सकाळी ही घटना घडली आहे.

तिहार जेलमध्ये असलेला कुख्यात गँगस्टर टिल्लू ताजपुरिया उर्फ सुनील मान याची हत्या करण्यात आली आहे. तुरुंगात असलेल्या योगेश टुंडा आणि त्यांच्या साथीदारांनी लोखंडी रॉडने टिल्लू यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. तुरुंग कर्मचाऱ्यांनी त्याला तातडीने दीनदयाळ उपाध्याय रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टिल्लू हा २०२१ च्या रोहिणी कोर्ट गोळीबारात मुख्य आरोपी होता. रोहिणी कोर्टाच्या आत कोर्ट रुममध्ये गुंड जितेंद्र गोगीच्या हत्येमध्ये टिल्लूचा हात होता. यानंतर दोघांनी एकमेकांवर हल्ले करण्यास सुरुवात केली. सध्या दोघेही तिहार जेलमध्ये होते. आज सकाळी योगेश टुंडा आणि सहकाऱ्यांनी टिल्लू यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला करून त्यांला ठार मारण्यात आलं.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version