तुळजापूर तालुक्यात चुलत्याकडून पुतण्यांची हत्या

11

तुळजापूर, दि. ३ जुलै २०२०: तुळजापूर तालुक्यातील आरळी बु येथे २ जुलै रोजी सायंकाळी ६.३० च्या सुमारास शेतीच्या जुन्या वादातून चुलत्याने दोन पुतण्याच्या डोक्यात पाठीमागून खोऱ्याने हल्ला करून दोघांची क्रूरपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

आरळी बु येथील सुरेश यादव वय वर्षे ५५ यांनी पुतणे रमेश विठोबा यादव वय वर्ष ४७ व गणेश गोविंद यादव वय वर्ष २९ या दोघांच्या डोक्यात शेती कामत वापरण्यात येणाऱ्या खोऱ्याचा वापर करत डोक्यात पाठीमागून वार केला. आणि ठेचून क्रूरपणे हत्या केली.

त्या दोघांची हत्या केल्यानंतर, आरोपी सुरेश यादव हा फरार झाला आहे तर दुसरा आरोपी त्याचा मुलगा संभाजी सुरेश यादव वय वर्ष २१ याला पोलसानी अटक केली आहे. पुढील तपास नळदुर्ग पोलीस करत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी – ज्ञानेश्वर शिंदे