गोल पोस्ट गुन्हा नीरा येथे बलात्कार केल्याचा राग धरून एकाचा खुन

नीरा येथे बलात्कार केल्याचा राग धरून एकाचा खुन

पुरंदर, दि. १६ मे २०२०: पुरंदर तालुक्यातील नीरा नजीक दगडेवस्ती येथे नात्यातील
महिलेवर बलत्कार केल्याचा राग धरून एकाचा खुन केल्याची तक्रार जेजुरी पोलिस स्टेशन मध्ये देण्यात आली आहे. यातील सर्व आरोपी नात्यातीलच असून या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली आहे

याबाबत पोलिसांकडून मिळलेली माहिती अशी की, दि १२ रोजी ६ वाजेच्या सुमारास मौजे निरा गावचे हद्दीत दगडेवस्ती (ता.पुरंदर) येथे फिर्यादी कु.सिद्धी बाबा दगडे हीच्या घरासमोर आरोपी विक्रांत वसंत दगडे, शारदा वसंत दगडे (रा.निरा दगडेवस्ती ता.पुरंदर, जि. पुणे) अपर्णा चंद्रकांत वळकुंदे, करण उर्फ अमर चंद्रकांत वळकुंदे (रा.कोळीवस्ती ता पुरंदर जि पुणे) यांनी एकत्र येऊन फिर्यादी यांची चुलता आजी शारदा वसंत दगडे हिचेवर फिर्यादीच्या वडिलांने बलात्कार केल्याचे कारणावरून मनात राग धरून विषारी औषध पाजून लाकडी बॅट, लाकडी दांडक्याने मारहाण करून खून केला आहे. त्यानंतर फिर्यादीच्या वडिलांचे प्रेत निरा नदी येथे नेऊन परस्पर विल्हेवाट लावली असल्या संदर्भात तक्रार दिली आहे. या बाबत पोलिसांनी भा.द.वि.कलम ३०२, २०१, ३४. नुसार गुन्हा दाखल केला आहे. यातील सर्व आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश माने यांच्या मार्गदर्शनाखाली विजय वाघमारे हे करित आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version