गोल पोस्ट महाराष्ट्र सराईत गुन्हेगार पप्पू पडवळ चा राहत्या घरी खून

सराईत गुन्हेगार पप्पू पडवळ चा राहत्या घरी खून

पुणे, दि. ११ जुलै २०२०: कोंढाव्यातील राहत्या घरी सराईत गुन्हेगार पप्पू उर्फ घनश्याम पडवळ ह्याचा राहत्या घरी कोयत्याने वार करुन खून करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , पप्पू पडवळ हा रेकॉर्ड वरील गुन्हेगार आहे. तो पूर्वी ड्रायव्हर चे काम करत होता. आता त्याचा सावकारी चा धंदा होता.

त्याचावर ह्या आधी एका गँग कडून वार झाले होते, त्यांचे वाद अजूनही सुरू होते. आज त्याचाच राहत्या घरी अज्ञातांनी घरी घुसून कोयत्याने वार करत खून केला आहे.
कोंढवा पोलिसांना माहिती कळताच घटनास्थळी पोलिस दाखल झाले व त्यांनी पुढचा तपास सुरू केला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वरी आयवळे

error: Content is protected !!
Exit mobile version