गोल पोस्ट महाराष्ट्र नगराध्यक्षा प्रतिभा भौलुमे यांनी समाज कंठकाचा केला निषेध

नगराध्यक्षा प्रतिभा भौलुमे यांनी समाज कंठकाचा केला निषेध

कर्जत, दि. ११ जुलै २०२०: कर्जतच्या नगर पंचायतीच्या नगराध्यक्षा प्रतिभा बैलुमे यांनी मुंबई येथील भारतरत्न डॉ. बाळासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानी झालेल्या तोडफोड हल्ल्याचा आज दिनांक ११जूलै रोजी तहसीलदार नानासाहेब आगळे पोलिस निरीक्षक सुनिल गायकवाड यांना निवेदन देऊन निषेध व्यक्त केला.

प्रतिभा बैलुमे यांनी या घटनेचा तीव्र निषेध करताना या गुन्हेगारावर देश द्रोहाचा खटला दाखल करावा असे अहवान केले आहे.ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानी काही देशद्रोही लोकांनी घरावर दगड मारून जे कृत्य केले आहे ते आंबेडकरांचा अपमान करनारे आहे.

अशा समाजकंठकांचा भैलुमे यांनी जाहीर निषेध व्यक्त केला आहे. पुढे त्या म्हणाल्या की बाळासाहेबाच्या विचाराची तुम्ही कधीच नाश करू शकणार नाही. ते आमच्या मनांतह्रदयात आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष

error: Content is protected !!
Exit mobile version