ज्ञानवापी सर्व्हेच्या मीडिया कव्हरेजवर बंदी घाला, मुस्लिम पक्षाची मागणी

प्रयागराज, ९ ऑगस्ट २०२३ : ज्ञानव्यापी मशिदीचे आज सलग सहाव्या दिवशी देखील सर्व्हे सुरू आहे. दरम्यान या सर्व्हेच्या मीडिया कव्हरेजवर बंदी आणावी अशी मागणी मुस्लिम पक्षकारांकडून करण्यात आली आहे. या संबंधीचा अर्ज मुस्लिम पक्षकारांनी जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीशांकडे दाखल केला आहे.

प्रयागराज उच्च न्यायालयाने ३ ऑगस्टला ASI ला मशिदीचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश देणाऱ्या कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाविरुद्धचे अंजुमन इंतेजामिया मस्जिद समितीच अपिल याचिका फेटाळून लावली. दुसऱ्या दिवशी सर्वोच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवला आणि सर्व्हे सुरू झाला. गेल्या पाच दिवसांपासून ज्ञानव्यापी संकुलाचे शास्त्रोक्त सर्व्हे सुरू आहे.

आज देखील सकाळी हे सर्व्हेक्षण पुढे सुरू ठेवण्यात आली आहे. दरम्यान या सर्व्हेविषयी दररोज माध्यमांमधून प्रत्येक दिवसाचे वृत्तांकन करण्यात येत आहे. हे मीडिया कव्हरेज बंद करावे अशी मागणी मुस्लिम पक्षाने जिल्हा न्यायालयाकडे अर्जाद्वारे केली आहे. याविषयी अद्याप कोणत्याही अधिकाऱ्यांनी कोणतेही अधिकृत विधान केलेले नाही.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा