ईदनिमित्त मुस्लिम महिला पंतप्रधान मोदींना पाठवणार ११ लाख पोस्ट कार्ड

मुंबई, ३१ मार्च २०२३: देशातील मुस्लिम महिलांनी पंतप्रधान मोदींना पोस्टकार्ड लिहिलंय. धन्यवाद मोदीजी लिहिलेल्या पोस्टकार्डमध्ये तिहेरी तलाकचा उल्लेख करण्यात आलाय, ज्याचे फायदे त्यांना मिळाले आहेत. या पोस्टकार्डच्या माध्यमातून मुस्लिम महिलांनी पंतप्रधान मोदींवर विश्वास व्यक्त केलाय. ते मानतात की पंतप्रधान मोदींनी तिहेरी तलाकवर केलेल्या कायद्यानं मुस्लिम महिलांना सशक्त केलं आणि त्यांचं जीवन सुरक्षित केलं. यामध्ये कोरोनाच्या काळात मोफत रेशन, उपचार आणि औषधांचाही उल्लेख करण्यात आलाय.

या महिलांनी अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अराफत शेख यांच्या घरी ५ लाख पोस्ट कार्ड पाठवले आहेत. याशिवाय आणखी ६ लाख पोस्ट कार्ड येणार आहेत. हाजी अराफत शेख यांनी सांगितलं की, ईदच्या दिवशी ११ लाख मुस्लिम महिलांचे पोस्टकार्ड पंतप्रधान मोदींना पाठवले जातील.

मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अराफत यांच्या मार्गदर्शनाखाली मुस्लिम महिलांची सहा लाख पोस्टकार्ड मुंबईहून दिल्लीला पाठवण्यात आली आहेत. प्रत्येक पोस्टकार्डवर मुस्लिम महिलांची नावं आणि त्यांचे मोबाईल नंबरही लिहिलेले आहेत.

हाजी अराफत मुस्लिम महिलांचे हे पोस्टकार्ड ईदच्या दिवशी पंतप्रधान मोदींना पाठवणार आहेत. अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफत आणि मुंबई प्रदेश अध्यक्ष आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली मुस्लिम महिलांनी सहा लाखांहून अधिक पोस्टकार्डवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थँक यू असं लिहिलंय.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा