चंद्रपूर जिल्ह्यात माझे कुटूंब, माझी जबाबदारी’ मोहिमेला सुरूवात

चंद्रप्रभ, २४ सप्टेंबर २०२० : चंद्रपूर जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या वतीने जिल्हा नियोजन सभागृहात ‘माझे कुटूंब, माझी जबाबदारी’ मोहीमेची माहिती देण्यात आली. यावेळी जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या चित्रफिती बाबतही जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी माहिती दिली. उमस हॉस्पिटल इथं ४५० बेड आणि ऑक्सिजन प्लान्टचे काम सुरू आहे. शिवाय मेडिकल कॉलेज आणि सैनिक शाळेत अतिरिक्त बेड आणि ऑक्सिजन प्लान्ट’ची कामं सुरू आहेत.

चंद्रपूर नागरिकांना चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील रुग्णस्थितीची माहिती सहज उपलब्ध व्हावी तसेच कोव्हीड १९ बाधितांकरीता उपलब्ध असणाऱ्या रुग्णालयांची माहिती आणि त्या रुग्णालयांमध्ये रुग्णसेवेसाठी वापरात असलेल्या बेड्सची संख्या तसंच उपलब्ध असलेल्या बेड्सची संख्या यांचीही माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी याकरता “कोव्हीड १९ डॅशबोर्ड” उपलब्ध करून देण्यात आला आहे.

नागरिकांनी https://www.ccmcchandrapur.com/hospital/ या लिंकवर क्लिक केल्यानंतर त्यांना संपूर्ण माहिती सहज उपलब्ध होणार आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा