माझे कुटुंब माझी जबाबदारी या उपक्रमास आलेगाव बुद्रुक येथून सुरुवात.

माढा, १६ सप्टेंबर २०२० : महाराष्ट्र शासनाने राबवलेल्या उपक्रमाची सुरुवात माढा तालुक्यातील आलेगाव बुद्रुक येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आलेगाव (बु ) येथे माझे कुटुंब माझी जबाबदारी बाबत जनजागृतीची सुरुवात करण्यात आली आहे . जि.प.सदस्या सौ.अंजनादेवी शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते या शुभारंभाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी मा.संचालक जि.दु संघ सोलापूर जिल्हा शिवाजीराव पाटील, डाॅ.नेहा देशमुख,डाॅ.नितीन देशपांडे ,सरपंच प्रतिनिधी रवींद्र पाटील, ग्रामसेवक लोकरे भाऊसाहेब ,आरोग्य सेवक ,काळे. एस.एम , नाळे.एम.आर, कदम.आर.एस ,डोंगरे.एम.एनखोकले.के .ए , झेंडे.डी. एस, चव्हाण.एस.व्ही,चव्हाण पी.व्ही, भोसले.आर.एस(परीचर),गोसावी जी (लॅब टेकनिशन)उपस्थितीत होते.

यावेळी शिवाजी पाटील म्हणाले कोंढारभागातील काही गावामध्ये कोरोनाने शिरकाव केला आहे. तर काही गावामध्ये कसलाही परिणाम दिसून आलेला नाही या गावाचे अभिनंदन करण्यात आले.परंतु कोरोना अजुन वाढू नये म्हणून प्रत्येकाने माझे घर माझी जबाबदारी या उपक्रमात प्रत्येकाने सहभागी होणे गरजेचे आहे.तरच कोरोनासारख्या आजाराला थांबवू शकू त्यासाठी ही जनजागृती होणे गरजेचे आहे असे पाटील यांनो आवाहन केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी-प्रदीप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा