म्यानमार, १ फेब्रुवरी २०२१: भारताचा शेजारी देश म्यानमार मध्ये सत्तापालट झाला आहे. म्यानमार सैन्याने सध्याचे नेते ऑंग सॅन सू की आणि राष्ट्रपती विन म्यंट यांना ताब्यात घेत एका वर्षासाठी आणीबाणी जाहीर केली आहे. म्यानमारच्या लष्करी टेलिव्हिजनने म्हटले आहे की, एका वर्षासाठी_£ पुन्हा सत्तेत परतले आहेत.
म्यानमार आर्मीचे म्हणणे आहे की, निवडणुकीतील घोटाळ्याला उत्तर देताना उठाव कारवाई केली गेली आहे. या सत्तापालटमुळे देशातील विविध भागात सैन्य दलाची तैनात करण्यात आली आहे. कोणीही सत्तापालटचा प्रतिकार करू नये म्हणून म्यानमारचे मुख्य शहर यांगून येथील सिटी हॉलच्या बाहेर सैनिक तैनात केले आहेत.
लष्कराकडून बर्याच काळापासून म्यानमारमध्ये राज्य केले जात आहे. १९६२ ते २०११ या काळात देशात ‘मिलिटरी जनता’ची हुकूमशाही आहे. २०१० मध्ये म्यानमारमध्ये सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या आणि २०११ मध्ये म्यानमारमध्ये ‘नागरी सरकार’ स्थापन झाले. ज्यामध्ये निवडून आलेल्या प्रतिनिधींना लोकांकडून राज्य करण्याची संधी मिळाली.
नागरी सरकार बनल्यानंतरही खरी सत्ता नेहमीच ‘आर्मी’कडे राहिली. अप्रत्यक्षपणे, ‘मिलिटरी जनता’ म्यानमारची पहिली शक्ती राहिली, या सत्तेला उखडणे बाहेरून जेवढे सोप्पे वाटत आहे तेवढे ते नाही. म्हणूनच सोमवारी घडलेली घटना म्हणजे म्यानमारच्या राजकीय परिदृश्याचे खर्या स्वरुपाशिवाय काही नाही.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे