गोल पोस्ट महाराष्ट्र साताऱ्याच्या लोणार गल्लीतील भुताचे रहस्य उलगडले, पुतळ्याला साडी घालून प्रॅन्क

साताऱ्याच्या लोणार गल्लीतील भुताचे रहस्य उलगडले, पुतळ्याला साडी घालून प्रॅन्क

सातारा २६ डिसेंबर २०२३ : सातारा शहारातील लोणार गल्लीत नगरपालिकेच्या शौचालयात एका युवतीला भूत दिसल्याची घटना समोर आली होती. ही बातमी पसरल्याने रविवार पेठ परिसरात भीतीदायक वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान लोणार गल्लीतील धीट नागरिकांनी भूत पहाण्यासाठी घटनास्थळी भेट दिली असता, ते भूत नसून तो एक कपड्याच्या दुकानातील पुतळा असल्याचे आढळुन आले.

शौचालयात गेलेल्या एका युवतीने तो पुतळा पाहिल्यानंतर ती घाबरून आजारी पडली. सातारा नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तो बाहुला आज सकाळी घंटा गाडीत टाकून त्या ठिकाणी साफसफाई केली. अज्ञाताने प्रॅन्क करण्याच्या दृष्टीने त्याला ओढणी गुंडाळून रात्रीच्या वेळी शौचालयात ठेवले होते. हि बाब समोर येताच परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला.

न्यूज अनकट प्रतिनिधी : ओंकार सोनावले

error: Content is protected !!
Exit mobile version