गोल पोस्ट अर्थ उद्योग “नाभिक” समाजाला आर्थिक मदत मिळण्यासाठी स्वप्निल कुंजीर सरसावले पुढे

“नाभिक” समाजाला आर्थिक मदत मिळण्यासाठी स्वप्निल कुंजीर सरसावले पुढे

कुंजीर वाडी, दि. १५ जून २०२० : आज सोमवार दि. १५ जून २०२० महाराष्ट्रातील “नाभिक” समाजाला आर्थिक मदत मिळावी व त्यांची केश कर्तनालय सुरु करावी यासाठी आज शिवसेनेचे माजी तालुका संघटक स्वप्निल कुंजीर यांनी विभागीय आयुक्त दिपक म्हैसेकर यांची भेट घेऊन निवेदन दिले.

यावेळी स्वप्निल कुंजीर यांनी आयुक्त म्हैसेकर यांच्याशी सुमारे अर्धा तास नाभिक समाजाची व्यथा सांगितली यावर आयुक्त म्हैसेकर यांनी तत्काळ निवेदनावर शेरा मारत लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.

यावेळी भाऊसाहेब कुंजीर वैभव गावडे, नाना कुंजीर सह अन्य मान्यवर उपस्थीत होते. नाभिक समाजासाठी आवाज उठवणरा एकमेव मराठा नेता म्हणून स्वप्निल कुंजीर यांचे नाभिक समाजाच्या वतीने आभार मानण्यात आले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी – ज्ञानेश्वर शिंदे

error: Content is protected !!
Exit mobile version