पुणे, २ ऑगस्ट २०२२: शिवसेना, डी एम के, तृणमूल, राष्ट्रवादी काँग्रेस, झा मु मो,आम आदमी पार्टी, टी आर एस असे प्रादेशिक आणि इतर छोटे मोठे पक्ष यांना पूर्णपणे सम्पवण्याचे मिशन भाजपा ने आखल्याचे सूतोवाच काल जे.पी.नड्डा यांनी केले आणि तितक्याच जोशात प्रतिहल्ला करताना प्रादेशिक आणि छोट्या मोठ्या पक्षांनी नड्डा यांचे मिशन कसे कुचकामी आहे हे दर्शवणारे व्हिजन मांडले.
भाजप च्या मिशन चाच एक भाग म्हणजे, संजय राऊतांना अटक, दिल्लीत आम आदमी पक्ष्याचे सत्येंद्र जैन जेलमध्ये आहेत, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची चौकशी चालू आहे, त्यांनाही कदाचित जेलवारी चुकणार नाही, संसदेत आक्रमक भूमिका घेऊ शकणारी शिवसेना भाजपने अगोदरच फोडलीय, तिकडे बंगालमध्ये धाडी टाकून ममता दीदीला जेरबंद केलीय,इकडे काँग्रेस प्रमुख सोनिया गांधी यांच्या वर चौकशी लावून त्यांनाही जेरीस आणलंय.. खास करून झारखंड, छत्तीसगढ, राजस्थान, केरळ,तामिळनाडू, तेलंगाणा, उडीसा, प.बंगाल, पंजाब या बिगर भाजप राज्यांमध्ये भाजपा विशेष मोहिमा राबवतेय.
संसदेच्या अधिवेशनातून सात दिवसांसाठी निलंबित करण्यात आलेल्या विरोधी पक्षातील आम आदमी पक्षाचे फायरब्रॅंड खासदार संजय सिंग संसदेच्या परिसरात आंदोलन करतायत…त्यांचा गुन्हा हा आहे की, महागाई, बेरोजगारी, इंधन दरवाढ, अन्नधान्यावर जीएसटी यावर सरकारने चर्चा करावी यासाठी त्यांनी आक्रमक भूमिका घेतली…परिणामस्वरूप त्यांना निलंबित करण्यात आले…अशाच प्रकारचे निलंबन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या, काँग्रेस, तृणमूलच्या खासदारांवर ओढवलय…
अर्थ एकच संसदेत आणि बाहेर विरोधी पक्षांना शक्तीहीन करून नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांना बगल द्यायची सरकारी इच्छा आहे…
न्यूज अनकट प्रतिनिधी: गुरु पोरे