गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा नगर-मनमाड रोडवर मालट्रक उलटला

नगर-मनमाड रोडवर मालट्रक उलटला

नगर : शहरातून जाणाऱ्या नगर-मनमाड निंबळक बायपास रस्त्यावर आज (दि.३) सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास मालट्रक उलटला. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. परंतु सुमारे ६ तासांपासून वाहतूक ठप्प झाली आहे.
नगर-मनमाड रस्त्यासाठी पुण्याहून येणारी जड वाहतूक केडगावपासून या निंबळक बायपास रस्त्यावरुन वळविली आहे. या रस्त्यावर खताच्या गोण्या वाहून नेणारा १६ टायरचा मालट्रक रस्त्याच्या मधोमध उलटला.
दोन क्रेनच्या साह्याने मालट्रक बाजूला काढण्याचे काम सुरू होते. दरम्यान दुपारी १२ वाजेपर्यंत या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत झाली नव्हती.

error: Content is protected !!
Exit mobile version