गोल पोस्ट समाजकारण नगरसेवक भानगिरे यांच्याकडून गरजूंना मदत

नगरसेवक भानगिरे यांच्याकडून गरजूंना मदत

हडपसर, दि. ४ मे २०२०: कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात अनेक व्यवसाय बंद झाले आहेत. उद्योग धंदे, व्यवसाय व कंपन्यासह सर्व व्यवहार बंद झाल्यामुळे अनेकांचे हाल होत आहेत व दिवसभर काम करून सायंकाळी जेवण करायचे आशा लोकांना सध्या रोजगार नाही व त्यांची अवस्था दयनीय झाली आहे त्यांना वेळीच मदत करणे हे आपले कर्तव्य आहे म्हणून , काल ( दि.३ ) रोजी नगरसेवक भानगिरे यांनी महंमदवाडी कौसरबाग येथे गोर-गरीब नागरिकांना जेवण व अत्यावश्यक वस्तू देण्याचे काम सुरू केले आहे.

प्रभागमध्ये पाणी, कचरा, रस्ते, आशा अनेक प्रश्नासाठी काम करण्याचे व्रत हाती घेतले आहे असे “न्यूज अनकट” शी बोलताना त्यांनी सांगितले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी-ज्ञानेश्वर शिंदे

error: Content is protected !!
Exit mobile version