नागपूर अधिवेशनात शिवसेना आणि भाजप आमदारात धक्काबुक्की

नागपूर : यंदाच्या वर्षी अवकाळी पावसामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना २५ हजार रुपये नुकसान भरपाई द्या, अशी मागणी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात केली. यावेळी चर्चा सुरू असताना धक्कादायक प्रकार विधिमंडळात घडला आहे. शेतकरी प्रश्नावरून शिवसेना आणि भाजपच्या आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली आहे.

शेतकरी प्रश्नावरून चर्चा सुरु असतानाच शिवसेनेचे बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड आणि भाजपचे आमदार अभिमन्यू पवार या दोघांमध्ये जोरदार धक्काबुक्की झाल्याचे पाहायला मिळाले. सभागृहात दोन आमदारांमध्ये धक्काबुक्की झाल्याने मोठा गोंधळ उडाला. त्यानंतर सत्तारूढ पक्षाकडून जयंत पाटील आणि भास्कर जाधव आमदारांना समजावत आहेत.

तर भाजपकडून आशिष शेलार आणि गिरीश महाजन हे भाजप आमदारांना आवरण्याचा प्रयत्न करत आहेत.
सभागृहात बॅनरबाजी करणाऱ्या भाजप आमदारांवर निलंबनाची कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. सभागृहात बॅनरबाजी करणाऱ्या भाजप आमदारांविरोधात विधानसभा अध्यक्ष नाना पटोले कारवाई करणार असल्याची माहिती मिळत आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा