नागपूरच्या धंतोली परिसरात भाजपचे माजी नगरसेवक मुन्ना यादव यांचा मुलगा अर्जुन यादव याच्यावर शिवीगाळ आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी जग्गू यादव हे कुटुंबासोबत जेवत असताना अर्जुनने घराबाहेर येऊन शिवीगाळ करत पाहून घेण्याची धमकी दिल्याची तक्रार करण्यात आली. अर्जुन यादववर यापूर्वीही मारहाण आणि शिवीगाळ प्रकरणी अजनी व धंतोली पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: सुमित ठाकरे















































