नागपूर १० मार्च २०२४ : नागपूर गुन्हे शाखेच्या एनडीपीएस पथकाने मेफेड्रोन या औषधाची विक्री करणाऱ्या दोन तरुणांना ताब्यात घेत त्यांच्याकडून सुमारे २४१ ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आली. त्याची किंमत सुमारे २४,१५,००० रुपये असल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी काही तरुणांकडे मेफेड्रोन नावाची अंमली पदार्थाची पावडर मोठ्या प्रमाणात असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्या माहीतीच्या आधारे गुन्हे शाखेच्या एनडीपीएस सेलने अजनी परिसरात सापळा रचून आरोपी आतिश लक्ष्मण बागडे (२८), अजनी रेल्वे क्वार्टर क्र. आरबी १/३२६, ब्लॉक क्र. ए.बी., अजनी, नागपूर व गौरव उर्फ सागर शेषराव कटारे (वय २५, रा. टिमकी तीनखंबा चौक, हनुमान मंदिराजवळ, नागपूर) यांना ताब्यात घेऊन झडती घेतली असता, त्यांच्याकडून २४१ ग्रॅम मेफेड्रोन सदृश पावडर आढळून आली, ज्याची बाजारातील किंमत सुमारे २४,१५,००० रुपये असल्याचे सांगितले जाते. तसेच इतर ईलेक्ट्रॉनिक गँजेट असा एकंदरीत २५,८६,८०० रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याशिवाय मोबाईल फोन, बॅग, दुचाकी क्र. MH-49/BD-5346, नंबर प्लेट नसलेली मोपेड, एक किपॅड मोबाईल, लोखंडी कुकर व २५,८६,००० रुपयांचा माल जप्त करून आरोपींना अजनी पोलिसांच्या स्वाधीन केले असून अजनी पोलीसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई महिला पोलीस निरीक्षक ललिता तोडसे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज घुरडे, हवालदार शैलेश डोबळे, विजय यादव, विवेक आढाऊ, मनोज नेवारे, अंमलदार रोहित काळे, सहदेव चिखले, शेषराव रेवतकर, सुभाष गजभिये, अनूप यादव तसेच चालक पोलीस हवालदार नितीन साळुंके, प्रवीण ठाकूर, डॉग युनिटचे सुखदेव धुर्वे, अमोल पडघाम यांचे पथक यांनी कारवाई केली.
न्यूज अनकट प्रतिनिधी : निता सोनवणे