नागपूर विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई, ८७ लाखांच्या सोन्यासह २ जणांना अटक

नागपूर, २० सप्टेंबर २०२३ : नागपुरातून एक मोठी बातमी समोर येत आहे. नागपूर विमानतळावर सीमाशुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. नागपूर विमानतळावर सोन्याच्या तस्करीचे प्रकरण समोर आले असुन, माहितीनुसार कस्टम विभागाने नागपूर विमानतळावर कतारहून आलेल्या दोघांना अटक केली आहे. सीमाशुल्क विभागाने केलेल्या एका मोठ्या कारवाईत कतारहून आलेल्या दोघांकडून ८७ लाख रुपयांचे सोने जप्त करण्यात आले आहे.

मोहम्मद शाहिद आणि पीरबाबा सौदागर अशी अटक केलेल्या दोघांची नावे असुन त्यांची ओळख पटली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे दोघेही कर्नाटकचे रहिवासी आहेत. या प्रकरणाची गुप्त माहिती मिळताच दोघांनाही अटक करण्यात आली. कस्टम अधिकारी दोघांचे कॉल रेकॉर्ड तपासत असून एवढ्या मोठ्या प्रमाणावर सोन्याची तस्करी कोठून होत होती, याचाही तपास ते करत आहेत. त्यातून आणखी काही संबंध उघड होण्याची शक्यता आहे. सीमाशुल्क विभागाला ही मोठी कारवाई करण्यात यश आले असून, याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा