नागपुरात सोमवारी होळी निमित्ताने स्वच्छता अभियान आणि रामधुनचे आयोजन

नागपूर, २३ मार्च २०२४ : संपुर्ण महाराष्ट्रात होळी हा सण मोठ्या उत्साहने साजरा केला जातो. होळी या सणाच्या निमित्याने विकृत वागणे आणि गलिच्छ शिवीगाळ करुन चिखलफेक करणे अशा स्वरुपाचे विकृतीकरण आले आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी होळी सणाचे पारंपरिक व पर्यावरण महत्व लक्षात घेऊन समाजातील अनिष्ठ परंपरा आणि पसरलेली विकृती नष्ट व्हावी याकरिता परिसरात ग्राम स्वच्छता, सांस्कृतिक प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करून होळी दीन ग्रामशुध्दी दीन म्हणून साजरा केला. तसेच त्यांनी रामधून काढली. या रामधुनमध्ये स्वच्छ पोषाख परिधान करुन नामस्मरण करित भजन गात रामधून काढावी. तसेच रामधुनच्या मार्गावर महापुरुषांचे किंवा आपल्या ईष्ट देवतांचे फोटो लावुन त्यांच्या विचारांचा जयजकार करण्यात यावा. अत्यंत शिस्तमध्ये रामधुनचे संचलन करण्यात यावे. हा निर्मल उद्देश ठेवुन ग्रामशुध्दी दिन साजरा करावा. असा महारांजांचा आग्रह होता.

श्री गृरुदेव सेवा मंडल नागपूरच्या वतीने तुकडोजी महाराजांनी घालुन दिलेल्या परिपाठानुसार सेवाश्रम परिसरात स्वच्छता करुन होळीच्या निमित्याने रामधुन काढण्यात येते. गणेशपेठ, शनिवारी, गुजरवाडी या नजीकच्या परिसरात रामधुनचे संचलन करण्यात येते. या रामधुनमध्ये स्वच्छ पोषाख परिधान करुन असंख्य भाविक सहभागी होतात.

दरवर्षी अनोख्या पध्दतीने श्रीगृरुदेव सेवा मंडल ग्राम शुध्दी दिन साजरा केला जातो. यावर्षीही सोमवारी 25 मार्च रोजी, होळी निमित्ताने परिसरात स्वच्छता अभियान राबवुन रामधुनचे आयोजन करुन ग्राम शुध्दी दिन साजरा करण्यात येणार आहे. तसेच कार्यक्रमाचा समारोप प्रसिद्ध कवी ज्ञानेश वाकुडकर यांच्या काव्य महफिलीने होणार आहे. या कार्यक्रमात गृरुदेव भक्त व जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थीत रहावे. असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : नीता सोनवणे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा