नागपूर, ३ जून २०२३ : नागपूरातील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस हे देशातील नॅशनल अक्रिडेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स अॅड हेल्थकेअर प्रोव्हायडर्स चे मानांकन प्राप्त करणारे प्रथम रुग्णालय ठरले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एम्स नागपूरच्या टीमचे अभिनंदन केले आहे. एनएबीएच मान्यता हे आरोग्यसेवेच्या गुणवत्तेसाठी जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त मानांकन आहे.
एनएबीएचची मान्यता प्रकिया कठोर आणि सर्वसमावेशक असते. यामध्ये रुग्णांची काळजी, सुरक्षितता आणि संस्थात्मक कार्यक्षमतेसह अनेक क्षेत्रांमध्ये रुग्णालयाच्या कामगिरीचे मूल्यांकन केले जाते. एम्स नागपूरने एनएबीएची मान्यता मिळवून आरोग्य क्षेत्रात एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. यामुळे या रुग्णालयाकडे रुग्णांचा आणि त्याच्या नातेवाईकांचा बघण्याचा दृष्टीकोन बदलेला आहे.
एम्स नागपुरबाबतचे ट्विट सामायिक करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रुग्णालयाचे अभिनंदन केले. ते म्हणाले या कामगिरीबद्दल एम्स नागपूरच्या टीमचे अभिनंदन, ही कामगिरी करत दर्जेदार आरोग्य सेवा पुरवण्याचा एक मापदंड स्थापित केला आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या रुग्णालयाचे लोकार्पण डिसेंबर २०२२ मध्ये झाले होते.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर