नागरिकांची सतर्कता; जखमी कळवीटाला मिळाले जीवदान

जालना, दि.१ जून २०२०: जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात नागरिकांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे एका काळवीटाला जीवदान मिळाले आहे.

भोकरदन तालुक्यातील प्रल्हादपुर शिवारात एका शेताजवळ काटेरी झुपडात एक काळवीट जखमी अवस्थेत असल्याची माहिती शेतकरी धोंडीबा सुरंगें यांनी छावा संघटनेचे तालुका अध्यक्ष विष्णू गाढे व आप्पासाहेब जाधव यांना दिली होती.

त्यानंतर घटनास्थळी पोहचून त्यांनी काळवीटाला झुडुपातून बाहेर काढुन पाणी पाजून सावलीत आणले. यावेळी वनविभागाला संपर्क केल्यानंतर वनसेवक जी.एम. शिनगारे व त्यांचे वनसेवक सहकारी श्याम पाटील यांनी घटनास्थळी पोहचून जखमी अवस्थेतील काळवीटावर प्रथमोचार करून पुढील उपचारासाठी वनविभागाच्या कार्यालयात घेऊन गेले.
यावेळी सांडू नामदे , परसराम बुरंगे आदींनी सहकार्य केले.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा