प्रत्येक नागरिकाच्या खात्यावर सहा हजार रुपये जमा करण्याची मागणी

बारामती, दि.२२ मे २०२०: तालुक्यातील काँग्रेसच्या वतीने गरजू व गरीब लोकांना केंद शासनाच्या वतीने दर महिन्याला सहा हजार रुपये जमा करावे,अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी एक दिवसाचे २०० रुपये
या गरजू लोकांना देण्यात आले.

माजी पंतप्रधान भारतरत्न स्व.राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त बारामती विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने बारामती शहरात १ लाख ४४ हजार रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या नागरिकांच्या खात्यावर दर महिना ६ हजार रुपये जमा करावे अशी मागणी केली आहे.
यासाठी बारामती येथील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आज शहरातील गरजू व गोरगरीब १११ लोकांना एक दिवसाचे २०० रुपये या प्रमाणे मदत केली व त्यांच्या कडून या योजनेचा लाभ मिळावा म्हणून कागद पत्रांची पूर्तता करण्यात आली आहे .

“युवा काँग्रेस देगी एक दिन का न्याय” या योजने अंतर्गत पुढील ६ महिन्याचे न्याय केंद्र, न्याय योजनेची प्रतिकात्मक स्वरूपात अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी केंद्र सरकारकडे करणार आहे. या गरजू लोकांच्या खात्यावर पैसे जमा केल्याने बाजारपेठेत देखील चांगली उलाढाल होईल असे वीरधवल गाडे यांनी सांगितले. यावेळी अॅड आकाश मोरे, अॅड अशोक इंगुले, शहर काँग्रेस अध्यक्ष जिल्हा युवक काँग्रेस सरचिटणीस विरधवल गाडे, विधानसभा अध्यक्ष वैभव बुरूंगले, सुशांत सोनवणे, सुरज भोसले व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा